Swadhar Yojana Maharashtra|स्वाधार योजना महाराष्ट्र|Free 51,000₹ Scholarshipस्वाधार योजना महाराष्ट्र:- विद्यार्थ्यांना 51 हजार शिष्यवृत्ती मिळेल बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
श्री बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना महाराष्ट्र राज्य:- या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य शासना ने गरीब व मागासवर्गीय आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना शिक्षणात येणारी आर्थिक अडचण दूर व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्फत गरजू विद्यार्थ्यांना 51 हजार रुपये आर्थिक मदत या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. अर्जदार विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती स्वरूपात ही मदत मिळेल.
योजनेचे नाव | महाराष्ट्र स्वाधार योजना 2024 |
संबंधित विभाग | समाज कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन |
शैक्षणिक वर्ष | 2024 |
वस्तुनिष्ठ | विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणे |
लाभार्थी | अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजाचे विद्यार्थी |
अधिकृत संकेतस्थळ | https://sjsa.maharashtra.gov.in/ |
स्वाधार योजना फॉर्म PDF डाउनलोड करा | CLICK |
स्वाधार योजनेची शेवटची तारीख | अद्याप उपलब्ध नाही |
श्री बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेला स्वाधार शिष्यवृत्ती योजना असेही म्हणतात या योजनेच्या माध्यमातून दहावी तसेच बारावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय आणि गरजू कुटुंबातील मुलांना या योजनेच्या माध्यमातून शासनाच्या तरफे भरपूर अशी आर्थिक मदत मिळते. कारण अशा कुटुंबातील मुलांना शिक्षणात कोणतेही आर्थिक अडचण येऊ नये या हेतूने सरकार शिष्यवृत्ती योजना देते. या योजनेचा लाभ एसटी आणि एस सी म्हणजेच नवबौद्ध वर्गातील विद्यार्थ्यांना होतो.
Swadhar Yojana Maharashtra
इयत्ता बारावी आणि अकरावी मध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना तसेच 2024 मध्ये अर्ज करणाऱ्या पात्र उमेदवारांना तसेच ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वस्तीगृहात प्रवेश मिळावा नाही अशा सर्व विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. स्वाधार महाराष्ट्र योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणा साठी ही प्रवेश होऊ शकेल, या सर्व विद्यार्थ्यांना बाबासाहेब आंबेडकर स्वाधार महाराष्ट्र योजनेअंतर्गत 51 हजार रुपये अशी आर्थिक स्वरूपात मदत शिष्यवृत्ती मिळू शकते.
या लेखांमधून तुम्हाला स्वाधार योजनेबाबत सर्व प्रकारची माहिती आम्ही देणार आहोत जसे की स्वाधार योजनेचा फॉर्म कसा भरावा स्वधार योजनेसाठी कोणकोणत्या प्रकारातील विद्यार्थी पात्र त्या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे या योजनेची गुणवत्ता यादी आणि या योजना भरण्यासाठी अंतिम तारीख तसेच या योजनेतून आपल्याला किती व कशी शिष्यवृत्ती मिळेल या सर्व प्रकारच्या गोष्टी आम्ही आपल्याला या लेखा माध्यमातून सांगणार आहोत .
सुविधा | खर्च |
बोर्डिंग सुविधा | ₹२८,०००/- |
निवास सुविधा | ₹१५,०००/- |
विविध खर्च | ₹८,०००/- |
वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी | ₹५,०००/- (अतिरिक्त) |
इतर शाखा | ₹2,000/- (अतिरिक्त) |
एकूण | ₹५१,०००/- |
जर तुम्हाला स्वाधार महाराष्ट्र योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती मिळवायची असेल आणि जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल आणि जर तुम्हाला अर्ज करण्याची इच्छा असेल किंवा तुम्ही या योजनेसाठी अर्ज करणार असाल तर त्यापूर्वी हा आमचा लेख पूर्ण शेवटपर्यंत वाचा जेणेकरून तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून स्वाधार योजनेच्या साठी लागणारी सर्व माहिती या लेखातून मिळेल आणि तुम्हाला योजनेचा फॉर्म भरण्यासाठी मदत मिळेल.
स्वधार योजना महाराष्ट्र राज्य
तर मित्रहो खाली तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना महाराष्ट्र राज्य या योजनेची सर्व माहिती दिलेली आहे अर्ज करण्यासाठी लागणारी लिंक आणि स्वाधार योजनेचा पीडीएफ स्वरूपातील फॉर्म या लिंक मधून तुम्ही डाऊनलोड करा जेथून तुम्ही बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना महाराष्ट्र राज्य या योजनेची पीडीएफ डाऊनलोड करू शकता.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना महाराष्ट्र यासाठी पात्रता
या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी या योजनेत पात्र हवा त्या साठी पुढील काही निकष लावले आहे या निकषात जर लाभार्थी पात्र असेल तरच तो या योजनेचे लाभ मिळू शकतो.
ALSO READ
- Mukhyamantri Rajshri Yojana Maharashtra 2024 Apply free now: NEW महाराष्ट्र लेक लाडकी योजना
- PM Awas Yojana Gramin 2024 |घर बैठे पीएम आवास योजना के लिए ऑनलाइन FREE आवेदन करे
महाराष्ट्र स्वाधार योजना पात्रता :-
- ○ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्जदार लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असणे गरजेचे आहे.
- राज्यातील अनुसूचित जाती आणि जमाती आणि नव-बौद्ध समाजातील मुले स्वतः महाराष्ट्र योजनेसाठी पात्र असतील.
- तसेच या योजनेसाठी पात्र लाभार्थी इयत्ता दहावी बारावी किंवा पदवी डिप्लोमा व्यवसायिक अभ्यासक्रम यापैकी एका अभ्यासक्रमात शिकत असावा.
- सगळ्यात महत्त्वाचा निकष म्हणजे की विद्यार्थ्यांनी चालू म्हणजेच रेगुलर अशा प्रकारे त्याचा प्रवेश घेतलेला असावा तो एक्स्टर्णल प्रकारे अभ्यासक्रम नसला पाहिजे तो नियमित विद्यार्थी म्हणून त्याचा प्रवेश असला पाहिजे आणि महत्त्वाची म्हणजे मुक्त विद्यापीठातले विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नसतील.
- योजनेसाठी शैक्षणिक पात्रता ही आहे की मागील वर्षी या लाभार्थ्यास मागील इयत्तेमध्ये 60 टक्के गुण मिळालेले पाहिजे आणि दिव्यांग लाभार्थ्यांना या योजनेमध्ये 20% सूट दिली आहे म्हणजेच दिव्यांग लाभार्थ्यांसाठी गुणपात्रता ही 40% अशी आहे.
- या योजनेसाठी लाभार्थ्याची स्वतःचे असे एक बँक खाते हवे आणि ते बँकेचे खाते त्याच्या आधार कार्ड सोबत लिंक हवे.
- या योजनेसाठी आर्थिक पात्रता ही आहे की योजनेच्या पात्र लाभार्थ्याची वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे जर एखाद्या लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तो लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरला जाणार नाही.
वरील दिलेल्या पात्रता आणि निकषांमध्ये बसणारा लाभार्थ या योजनेसाठी पात्र ठरला जाईल आणि अशाच विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल आणि हा लाभ घेण्यासाठी त्या उमेदवाराला ऑफलाईन स्वरूपात अर्ज करणे आवश्यक आहे.
स्वाधार योजना महाराष्ट्र राज्य या योजनेचे फायदे:-
- स्वाधार योजनेसाठी पात्र विद्यार्थी यांना सरकार तर्फे 51 हजार रुपये शिष्यवृत्ती स्वरूपात आर्थिक मदत दिली जाणार आहे.
- शोधार योजनेच्या माध्यमातून मिळणारी आर्थिक शिष्यवृत्ती रकमेचा वापर विद्यार्थी स्वतःच्या शिक्षणासाठी शिक्षणाच्या खर्च म्हणजेच जसे की राहणे खाणे आणि शिक्षण इत्यादी शुल्क देण्यासाठी करू शकतो.
- महाराष्ट्र स्वाधार योजनेच्या माध्यमातून गरीब आणि माघार स्वर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना होणारा शिक्षणाबाबतचा खर्च याचा त्यांच्या पाकालकांवर येणारा भोज या योजनेमुळे कमी होईल.
- अशाप्रकार पात्र लाभार्थी स्वाधार योजना महाराष्ट्र राज्य या योजनेचा लाभ घेऊ शकतो आणि पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी आपल्या अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी या योजनेचा लाभ होतो.
स्वधार महाराष्ट्र योजनेचे अनुदान व लाभ यांची मंजूर यादी
स्वतः योजना 2024 अंतर्गत महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि जमाती यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणि शिक्षणिक खर्चासाठी अनुदान दिले जाते जेणेकरून ती आपला अभ्यास क्रम या योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या खर्चातून पूर्ण करू शकतील या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सरकार च्या माध्यमातून अनुदानाची रक्कम दिली जाते.
स्वाधार योजना महाराष्ट्र राज्य यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी
स्वाधार योजना महाराष्ट्र राज्य या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांना पुढील प्रकारे कागदपत्रे असणे आवश्यक आहे पुढील कागदपत्रे ऑनलाईन फॉर्म भरताना जर नसतील किंवा जर ते उपलब्ध नसतील तर तो लाभार्थी या योजनेसाठी पात्र ठरणार नाही सर्व कागदपत्रे या उपलब्ध असणे आवश्यक आहे.
खालील कागदपत्रे स्वतः योजनेसाठी आवश्यक आहेत.
- योजनेचा नमुना अर्ज
- इयत्ता बारावी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
- बोनाफाईड प्रमाणपत्र
- लाभार्थ्याच्या वडिलांचे जात प्रमाणपत्र
- लाभार्थी अपंग असल्यास त्याचे अपंगत्व प्रमाणपत्र
- लाभार्थ्याची वार्षिक उत्पन्नाचा उत्पन्न दाखला (वार्षिक उत्पन्न रुपये 2.5 लाखापेक्षा कमी असणे गरजेचे आहे)
- लाभार्थी किंवा त्याच्या पालकांचे राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक खाते पुस्तकाची झेरॉक्स.
- विद्यार्थी शासकीय वस्तीगृहात राहत नसल्यास त्याचे प्रतिज्ञापत्र.
- लाभार्थ्याचा रहिवासी दाखला.
- विद्यार्थ्यांच्या पालकांची प्रतिज्ञापत्र
- लाभार्थी शिकत असलेल्या शाळा किंवा महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक किंवा प्राध्यापकाची शिफारस प्रमाणपत्र.
लाभार्थ्याकडे वरील प्रकारातील सर्व कागदपत्रे असणे बंधनकारक आहे.
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना महाराष्ट्र राज्य अर्ज
- स्वाधार योजना महाराष्ट्र राज्य या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऑनलाइन स्वरूपातील लिंक किंवा पोर्टल अवेलेबल नाही.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या योजनेची पीडीएफ स्वरूपातील फाईल डाऊनलोड करणे आवश्यक आहे ती फाईल तुम्हाला व आम्ही दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळेल.
- आम्ही दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळणारी पीडीएफ फाईल तुम्ही डाऊनलोड करून तिची प्रिंट ऑफ स्वरूपातील हार्ड कॉफी डाऊनलोड करून घ्यावी आणि त्या कॉपी वर दिलेली सर्व प्रकारची माहिती तुम्ही नीट वाचून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहावे आणि तुमची सर्व प्रकारची माहिती त्या फॉर्मवर लिहावी.
- फॉर्म मध्ये भरलेली संपूर्ण माहिती त्या माहिती सोबत दिलेली कागदपत्रे जोडून या आजा सोबत येण्याचे लक्षात ठेवावे.
- फॉर्म भरून झाल्यास आणि कागदपत्रे जोडल्यास तो फॉर्म जिल्हा समाज कल्याण विभागाकडे जाऊन जमा करावा आणि हा फॉर्म आपल्या जिल्हा समाज कल्याण विभागाच्या अधिकाऱ्याकडे जमा केले नंतर तेथील अधिकारी फॉर्म ची पडताळणी करतील आणि वळताळणी पूर्ण झाल्यानंतर आणि त्यात कुठल्याही प्रकारची चूक आढळल्यास दुरुस्ती करण्यास सांगशील त्यांनी सांगितलेली दुरुस्ती करून फॉर्म परत भरावा आणि सबमिट करावा.