शेतकऱ्यांसाठी ई-पिक पाहणी ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. 2024 साली, शेतकऱ्यांसाठी सरकारने पीक विमा, अनुदान, आणि इतर लाभ मिळविण्यासाठी ही ऑनलाइन प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ई-पिक पाहणी न केल्यास शेतकऱ्यांना पीक विमा मिळणे कठीण होईल तसेच अन्य शासकीय अनुदानातून वंचित राहण्याची शक्यता आहे.
या लेखात, ई-पिक पाहणी कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवरून कशाप्रकारे ई-पिक पाहणी प्रक्रिया पूर्ण करायची हे समजून घेण्यासाठी हा लेख उपयुक्त ठरेल.
ई-पिक पाहणी कशी करावी

QUICK INFORMATION:
स्टेप | ऍक्शन डिस्क्रिप्शन |
---|---|
1 | “E Pik Pahani” app Play Store वरून डाउनलोड करा. |
2 | App ओपन करा आणि तुमचं revenue division निवडा (उदा. Nashik, Amravati इ.). |
3 | Mobile नंबर टाकून farmer म्हणून login करा. |
4 | Account holder चं नाव निवडा आणि identification code टाका. |
5 | Land type (permanent किंवा temporary) निवडा आणि plot details भरा. |
6 | Crop inspection साठी “Record Crop Information” वर टॅप करा आणि crop season (उदा. Kharif) निवडा. |
7 | Crop details (type, variety, area) आणि irrigation method (उदा. well, borewell) भरा. |
8 | Crop planting ची तारीख टाका. |
9 | Crop field चे दोन फोटो capture करून upload करा. |
10 | Form सबमिट करा आणि process complete करा. |
ई-पिक पाहणी कशी करावी?
ई-पिक पाहणी करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमधून ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यासाठी, पुढील सोप्या पायर्या अनुसरा.
1. ई-पिक पाहणी ॲप डाउनलोड करा:
- सर्वप्रथम, आपल्या मोबाईलवर Play Store उघडा.
- ई-पिक पाहणी हे अॅप शोधा आणि डाउनलोड करा.
- ॲप डाउनलोड झाल्यानंतर ते उघडा.
2. प्राथमिक सेटअप:
- ॲप उघडल्यानंतर सुरुवातीचा इंटरफेस दिसेल. त्यामध्ये आपल्याला एक एक स्लाईड पुढे करावी लागेल.
- आता, महाराष्ट्रातील सहा महसूल विभागांपैकी आपला विभाग निवडा. विभागांमध्ये अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे असे विभाग आहेत.
- आपला जिल्हा जो महसूल विभागात येतो तो निवडा.
3. खरीप हंगामासाठी ई-पिक पाहणी:
- खरीप हंगामातील ई-पिक पाहणी करण्याची मुदत 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2024 आहे. यावेळी, शेतकऱ्यांनी पिकांची नोंद अनिवार्यपणे करावी.
4. शेतकरी लॉगिन:
- ॲपच्या मुख्य पेजवर शेतकरी लॉगिनचा पर्याय निवडा.
- शेतकऱ्यांचा मोबाईल नंबर एंटर करा.
- पुढे जा हा पर्याय निवडा.
- खातेधारकाचे नाव निवडून, सांकेत क्रमांक टाका. चार अंकी सांकेत क्रमांक विसरला असल्यास, ‘विसरला आहे’ या पर्यायावर क्लिक करून तो मिळवा.
5. पिकांची नोंद:
- पिकांची नोंद करण्यासाठी, पिकाच्या जमिनीची आणि इतर माहिती भरावी लागते.
- खाते क्रमांक आणि गट क्रमांक निवडून आपले क्षेत्र, कायम पड आणि चालू पड नोंदवा.
- नंतर, ई-पिक पाहणीच्या पर्यायावर क्लिक करा.
6. पीक वर्ग आणि प्रकार निवडा:
- पीक वर्ग निवडा. शेतात एकच पीक आहे का मिश्र पीक आहे हे निवडा.
- पिकाचा प्रकार निवडा. फळबाग असेल तर ती, आणि खरीप हंगामात घेतलेले पीक निवडा.
- उदाहरणार्थ, शेतात सोयाबीन असेल, तर सोयाबीन निवडा.
7. जलसिंचनाचे साधन आणि सिंचनाची पद्धत:
- शेतातील जलसिंचनाचे साधन निवडा. विहीर, बोरवेल, कुपनलिका इत्यादी उपलब्ध पर्यायांपैकी आपल्याला योग्य साधन निवडावे.
- सिंचनाची पद्धत निवडा. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, प्रवाह पद्धत, किंवा अन्य प्रकार निवडा.
8. पेरणी तारीख आणि क्षेत्र:
- पीक लागवड तारीख निवडा. यासाठी आपल्याला एक महिन्यापूर्वीची तारीख निवडावी लागेल.
- क्षेत्राच्या हेक्टरमध्ये मोजणी करा.
9. पीक छायाचित्रे अपलोड करा:
- आपल्या पिकाचे दोन छायाचित्रे घ्या. एक छायाचित्र पिकाच्या मध्यभागी जाऊन घ्या.
- दोन्ही छायाचित्र अपलोड करून, ग्रीन बाणावर क्लिक करा.
ई-पिक पाहणीच्या फायद्या:
- पीक विम्याचा लाभ: ई-पिक पाहणी केल्याशिवाय पीक विमा मिळणार नाही.
- शासकीय अनुदान: सरकारद्वारे देण्यात आलेले अनुदान मिळवण्यासाठी पिकांची नोंद आवश्यक आहे.
- जलद आणि सोपी प्रक्रिया: शेतकरी त्यांच्या मोबाईलवरून सहजपणे ई-पिक पाहणी करू शकतात.
- शेतीची आधुनिक माहिती: ई-पिक पाहणी अॅपच्या माध्यमातून शेतकरी त्यांच्या शेतीबद्दल आधुनिक आणि तात्काळ माहिती मिळवू शकतात.
काय करावे :
- वेळ वाया घालवू नका: तत्काळ नोंदणी करा. शेवटच्या दिवसात ॲप चे सर्व्हर down असतात त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो.
- आपल्या मित्र, नातेवाईक आणि शेजाऱ्यांमध्ये ही माहिती शेअर करा…
- कोणीही वंचित राहू नये: शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा.
- स्वतः नोंदणी करा: “माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पीक पेरा” हे लक्षात ठेवा.
ALSO READ:
mahayojanadoot.org : Yojana doot online apply form 2024: योजना दूत फॉर्मचे स्टेटस चेक करा
निष्कर्ष:
ई-पिक पाहणी 2024 ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. शेतकरी जर ही प्रक्रिया योग्य वेळेत पूर्ण करत असतील, तर त्यांना पीक विमा आणि शासकीय अनुदानाचा लाभ मिळू शकतो. वरील सर्व पायर्या अनुसरून शेतकरी आपल्या मोबाईलवरून ई-पिक पाहणी सहज करू शकतात. काहीवेळा ॲपमध्ये समस्या येऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हाला समस्या येत असल्यास, आपल्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत घ्या किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधा.